‘आमदारकीचे तिकिट’ मागणाऱ्याला सोनू सूदने दिले भन्नाट उत्तर, ट्विट व्हायरल


कोरोना महामारीच्या काळात अभिनेता सोनू सूदने अनेक प्रवासी कामगारांची घरी जाण्यासाठी मदत केली. अनलॉक प्रक्रियेमध्ये देखील तो अनेकांच्या मदतीसाठी पुढे आला. आता देखील सोशल मीडियावर मदतीची मागणी करणाऱ्यांना सोनू सूद नेहमीच मदत करतो. सोनू सूद ट्विटरवर आपल्या चाहत्यांना उत्तर देखील देतो. मात्र अनेकदा काही युजर्स भल्यातच गोष्टीची मागणी करतात. अगदी गेमपासून ते स्मार्टफोनपर्यंत अनेक गोष्टींची आतापर्यंत सोनू सूदकडे मागणी करण्यात आलेली आहे. आता तर एका युजरने सोनूकडे चक्क आमदारकीचे तिकिटच मागितले आहे.

सोनू सूदला टॅग करत एका युजरने लिहिले की, सर यंदा मला बिहारच्या भागलपूरमधून विधानसभेची निवडणूक लढवायची आहे व जिंकून लोकांची सेवा करायची आहे. फक्त सोनू सर मला भाजपकडून तिकिट मिळवून द्या.

बिहार विधानसभेसाठी आमदारकीचे तिकिट मागणाऱ्या या युजर्सला सोनू सूदने देखील भन्नाट उत्तर दिले. सोनू सूदने लिहिले की, माझ्या भावा, बस, ट्रेन आणि विमानाच्या तिकिटांशिवाय मला दूसरे तिकिट मिळवून देणे मला येत नाही.

सोनू सूदचे हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेक युजर्स यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.