मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने अवघ्या 2 मिनिटात असे काढा पीएफ खात्यातील पैसे


कोरोना व्हायरस महामारीमुळे अनेकजण आर्थिक तंगीचा सामना करत आहेत. अशात पीएफ खात्यातून पैसे काढणे हा एक मार्ग ठरू शकतो. तुम्ही देखील पीएफ खात्यातून पैसे काढण्याचा विचार करत असाल तर मोबाईलच्या अ‍ॅपच्या मदतीने अवघ्या काही मिनिटांमध्ये तुम्ही पैसे काढू शकता.

कोरोना संकटात मार्च ते ऑगस्ट महिन्यात 39 हजार कोटी रुपये काढण्यात आले आहे. तुम्ही UMANG अ‍ॅपच्या मदतीने पीएफ क्लेम करू शकता. उमंग अ‍ॅपच्या मदतीने पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी केवाईसी प्रक्रिया पुर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच UAN नंबर तुमच्या आधारशी लिंक असणे गरजेचे आहे व उमंग अ‍ॅप आधारशी लिंक असावे.

फॉलो करा या स्टेप्स  –

  • सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलवर उमंग अ‍ॅप डाउनलोड करा. सर्व कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे सदस्य या अ‍ॅपचा वापर करू शकतात.
  • अ‍ॅप उघडल्यावर ईपीएफओ पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर  ‘Employee Centric’ पर्याय निवडा.
  • आता ‘Raise Claim’ पर्याय निवडा
  • यानंतर तुमचा ईपीएफ यूएएन नंबर (EPF UAN Number) नंबर टाका. तुम्हाला यूएएन नंबर माहित नसल्यास कंपनीला विचारू सकता.
  • यूएएन नंबर सबमिट केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ओटीपी येईल, तो नमूद करा.
  • यानंतर रक्कम काढण्याची प्रक्रिया निवडा. तुम्हाला किती रक्कम काढायची आहे ती रक्कम टाका व सबमिट करा.
  • तुमचा क्लेम सबमिट झाल्यानंतर एक क्लेम रेफरेंस नंबर (CRN) मिळेल. हा नंबर जपून ठेवा.
  • सीआरएन (Claim Reference Number) च्या मदतीने तुम्ही क्लेमचीवर्तमान स्थिति ऑनलाइन चेक तपासू शकता.
  • यानंतर ईपीएफओद्वारे 10 दिवसात तुमच्या बँक खात्यात रक्कम ट्रांसफर होईल.