चीनच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या नेपाळने आता आणखी एक विवादित मोहीम सुरू केली आहे. नेपाळ आता उत्तराखंडमधील देहरादून, नैनीतालसह हिमाचल, उत्तर प्रदेश, बिहार आणि सिक्किममधील अनेक शहरं आपली असल्याचे सांगत आहे. नेपाळमधील सत्ताधारी पक्ष नेपाळी कम्यूनिस्ट पार्टी यूनिफाइड नेपाळ नॅशनल फ्रंटसोबत मिळून ग्रेटर नेपाळ मोहीम चालवत आहे. या मोहीमेंतर्गतच चीन भारतातील अनेक शहरांवर आपला दावा ठोकत आहे.
नेपाळचा वेडसरपणा, आता नैनीताल-देहरादूनवर ठोकला दावा
नेपाळ भारतीय शहरांवर दावा ठोकण्यासाठी 1816 मध्ये झालेल्या सुगौली तहाच्या आधीचा नकाशा दाखवत आहे. याद्वारे आपल्या देशातील नागरिकांना भ्रमित करत आहे. ग्रेटर नेपाळ मोहीमेंतर्गत परदेशात राहणारे नेपाळी युवक देखील मोठ्या प्रमाणात जोडले जात आहेत. यासाठी सोशल मीडिया कॅम्पेन देखील चालवले जात आहे. ग्रेटर नेपाळच्या युट्यूब चॅनेलवर नेपाळसह पाकिस्तानी युवक देखील भारताविरोधात बरळताना दिसत आहेत.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की नेपाळ सत्ताधारी पक्ष हा प्रचार भारत आणि नेपाळमधील अंतर वाढवण्यासाठी करत आहे. ग्रेटर नेपाळच्या दाव्याला कोणतेही आधार नाही. चीनच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या नेपाळच्या पंतप्रधानांवर चीनकडून कोट्यावधी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे.