अवघ्या 2 मिनिटात ‘ऑउट ऑफ स्टॉक’ झाला हा लाखो रुपये किंमतीचा धमाकेदार फोन


स्मार्टफोन कंपनी मोटोरोलाने मागील वर्षी फोल्डेबल स्मार्टफोन Moto RAZR ला लाँच केले होते. आता कंपनीने या स्मार्टफोनचे अपग्रेडेट व्हर्जन आणले. Moto RAZR ची किंमत 12,499 युआन (जवळपास 1 लाख 36 लाख रुपये) आहे. मात्र एवढी किंमत असतानाही हा स्मार्टफोन ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरून अवघ्या 2 मिनिटात ऑउट ऑफ स्टॉक झाला. याचा पुढील सेल 21 सप्टेंबरला आहे.

Image Credited – Yahoo

फोल्डिंग स्क्रिनसाठी कंपनीने या डिव्हाईसमध्ये खास हिंज मॅकेनिझ्म दिले आहे. याची स्क्रिन सहज फोल्ड होते. फोन ओपन केल्यानंतरही स्क्रिन अगदी फ्लॅट होते व याचा सहज वापर करता येतो. रिसर्चर्सचे म्हणणे आहे की Moto RAZR 5जी ला 2 लाख वेळा फोल्ड-अनफोल्ड करणे शक्य आहे. याचा अर्थ युजर्स कमीत कमी 5 वर्ष याचा वापर करू शकतात.

याशिवाय Moto RAZR 5जी फ्लेक्सिबल स्क्रिनचा वापर वॉटरड्रॉप शेपमध्ये करते. यामुळे फोनला आतील बाजूस फोल्ड करणे शक्य होते. याशिवाय इलास्टिक मेटल स्ट्रक्चर डिस्प्लेला ओपन केल्याल फ्लॅट ठेवते व यावर स्क्रॅच पडत नाही.

Image Credited – pcmag

मोटोरोलाच्या या नवीन फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये 6.2 इंच ओलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले फोल्ड होतो. तर आतील स्क्रिन 2.7 इंच आहे. पॉरफूल परफॉर्मेंससाठी यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 765जी प्रोसेसर देण्यात आलेला आहे. कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात 48 मेगापिक्सल प्रायमेरी आणि सेल्फीसाठी 20 मेगापिक्सल कॅमेरा मिळेल. डिव्हाईसमध्ये 2800mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 15W फ्लॅश चार्जिंग सपोर्टसह येते.