कमालच! 91 वर्षांचे प्राध्यापक असे घेत आहेत ऑनलाईन क्लासेस


जसजसे व्यक्तीच्या वय वाढत जाते, तसतसे नवनवीन गोष्टींमध्ये व्यक्ती मागे पडत जाते. काही लोक असेही असतात, जे नवीन गोष्टी शिकून स्पर्धेत टिकून राहण्याचा प्रयत्न करतात. सध्या कोरोना व्हायरसमुळे घरूनच ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत. अशात अनेक शिक्षक-प्राध्यापक फोन, कॉम्प्युटरच्या मदतीने घरूनच क्लासेस घेत आहेत. अशाच एका 91 वर्षीय प्राध्यापकांचा घरून ऑनलाईन क्लासेस घेतानाचा फोटो सध्या सोशल मीडिया व्हायरल होत आहे.

एकीकडे जगातील लोक वयाच्या 60 व्या वर्षी निवृत्त होत आहेत. तर दुसरीकडे हे प्राध्यापक वयाच्या 91 वर्षीही आवडीने आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत आहेत.

My father has been a professor of English at The University of St. Thomas for 50+ years. Here he is, at 91-years-old,…

Posted by Julia Krohn Mechling on Tuesday, September 1, 2020

जुलिया क्रोह्न मेकलिंग नावाच्या युजरने हा फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. फोटो शेअर करत युजरने लिहिले की, माझे वडील यूनिव्हर्सिटी ऑफ सेंट थॉमसमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक आहेत. ते मागील 50 वर्षांपासून तेथे शिकवत आहेत. ते आता 91 वर्षांचे असून, एखाद्या बॉसप्रमाणे व्हर्चुएल टिचिंग घेतात. ते दशकांपासून शिकवत आहेत, मात्र आजही त्यांच्यात तसाच उत्साह आहे जसा पहिल्यांदा होता. मुलांना माहित नाही ते किती नशीबवान आहेत.

या पोस्टला 28 हजारांपेक्षा अधिक वेळा शेअर करण्यात आले आहे. तर 10 हजारांपेक्षा अधिक जणांनी लाईक्स केले आहे.