कुरापतखोर चीनची सीमेवर नवीन चाल, भारतीय जवानांसाठी वाजवत आहे पंजाबी गाणी


भारत-चीनमध्ये सीमेवर मागील काही दिवसांपासून तणावाची स्थिती आहे. लष्करी आणि राजकीय स्तरावरील चर्चेनंतरही हा तणाव कमी झालेला नाही. सीमेवरील चीनच्या हालचाली वाढतच चालल्या आहेत. यातच आता चीनने एलएसीवर फिंगर-4 भागात लाउडस्पीकर लावले आहेत. या लाउडस्पीकरवर चीन पंजाबी गाणी वाजवत आहे.

आज तकच्या वृत्तानुसार, फिंगर-4 भागात चीनने लाउडस्पीकर लावले असून, हा भाग 24 तास भारतीय सैन्याच्या देखरेखेखाली आहे. चीन भारतीय जवानांचे लक्ष विचलित करण्यासाठी किंवा दबाव निर्माण करण्यासाठी असे करत असण्याची देखील शक्यता आहे. येथे भारतीय सैन्याकडून तैनात जवानांमध्ये शीख जवान देखील आहेत. त्यामुळे चीन पंजाबी गाणी वाजवून मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असण्याची शक्यता आहे.

फिंगर-4 भागात दोन्ही सैन्यामध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. काही दिवसांपुर्वी 8 सप्टेंबरला दोन्ही देशांनी फायरिंग केले होते. दोन्ही देशांच्या सैनिकांकडून 100 पेक्षा अधिक राउंड फायरिंग करण्यात आले होते.