चीनने आपल्या सैनिकांना मारल्यानंतर पंतप्रधानांनी त्यांच्याकडून 5,521 कोटींचे कर्ज घेत ‘सडेतोड’ उत्तर दिले – ओवैसी


खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी चीनच्या मुद्यावरून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. एका बातमीचा संदर्भ देत गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर सरकारने चीनकडून कर्ज घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

असदुद्दीन ओवैसी यांनी ट्विट केले की, 15 जून रोजी चिनी सैनिकांनी आपल्या 20 सैनिकांना मारले. त्यांचा मृत्यू विनाकारण व अत्यंत निर्दयी होता. 4 दिवसांनी, 19 जून रोजी पंतप्रधानांनी चीनकडून 5,521 कोटी रुपये उधारी घेऊन त्यांना ‘सडेतोड’ उत्तर दिले. हा आपल्या जवानांचा अपमान आहे.

याआधी देखील असदुद्दीन ओवैसी यांनी सीमेवरील चीनच्या घुसखोरीवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. संसदेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यानंतर ओवैसी ट्विट करत सवाल केला होता की, कोणत्याही भारतीय क्षेत्रावर ताबा नाही आणि घुसखोरी झालेली नाही ? मग गलवानमध्ये आपल्या 20 बहादुर सैनिकांनी प्राण कसे गमावले.