नितीन गडकरींंना करोना

फोटो सौजन्य झी न्यूज

केंद्रीय रस्तेनिर्माण परिवहन राजमार्ग मंत्री नितीन गडकरी याना करोनाची लागण झाली असल्याची माहिती गडकरी यांनी ट्विटरवर दिली आहे. गडकरी लिहितात ‘ काल अचानक अशक्तपणा जाणवू लागल्याने डॉक्टरांचा सल्ला घेतला तेव्हा त्यांनी चेकअप करायला सांगितले. त्यात माझी कोविड १९ टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. तब्येत ठीक आहे आणि मी आयसोलेशन मध्ये आहे. माझ्या संपर्कात जे लोक आले होते त्यांनी सावधानता बाळगावी, सर्व नियम पाळून सुरक्षित राहावे.’

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होण्याच्या अगोदर सर्व खासदारांची करोना चाचणी करण्यात आली होती त्यात ३० जणांना करोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यात मीनाक्षी लेखी, अनंत हेगडे, प्रवेशसाहिब सिंग वर्मा, सुखबीरसिंग, प्रतापराव जाधव, जनार्दन सिंह, हनुमान बेनिवाला, सेल्वम, प्रतापराव पाटील, सत्यपालसिंग यांचा समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याना यापूर्वीच करोना लागण झाली होती पण आता ते निगेटिव्ह आहेत,

बुधवारी देशातील करोनाग्रस्तांचा आकडा ५१ लाखांवर गेला असून ४० लाख रुग्ण बरे झाले आहेत. मृतांची संख्या ८३ हजाराहून अधिक झाली आहे असे सांगितले जात आहे.