सुशांत प्रकरणात ‘त्या’ व्यक्तीला सुरक्षा देण्याची नितेश राणेंनी अमित शाहांना केली विनंती

< भाजप आमदार नितेश राणे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहित रोहन रायला सुरक्षा देण्याची मागणी केली. रोहन राय हा मृत सेलेब्रेटी मॅनेजर दिशा सालियानचा जोडीदार होता. दिशाने 8 जूनला आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंध असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला होता. आता राणे यांनी केंद्राला पत्र लिहित दिशाच्या मृत्यू वेळी तेथे उपस्थित असलेल्या रोहन रायची मुंबई पोलिसांनी चौकशी केली नसल्याचे म्हटले आहे. https://twitter.com/NiteshNRane/status/1306126034769674241 नितेश राणे यांनी पत्रात लिहिले की, दिशाच्या मृत्यूवेळी रोहन राय घरात उपस्थित होता व तो 25-30 मिनिटांनी खाली आला. ही घटना संशय निर्माण करते.  रोहनने त्यानंतर मुंबई सोडली किंवा त्याला कोणीतरी मुंबई सोडण्यास भाग पाडण्यास सांगितले असावे. मला असे वाटते की कदाचित काही प्रभावशाली व्यक्तींच्या दबावामुळे तो मुंबईला परतण्यास घाबरत असावा. राणे यांनी अमित शाहांना रोहन रायला सुरक्षा देण्याची विनंती केली. जेणेकरून, तो मुंबईला परतू शकेल. त्याचा जबाब सध्या सुरू असलेल्या सीबीआय तपासात महत्त्वाचा ठरेल, असेही नितेश राणे म्हणाले.