राज्य सरकारचा मोठा निर्णय, 12500 पदांसाठी होणार पोलीस भरती


कोरोना व्हायरस महामारीमुळे केंद्रापासून ते राज्य सरकार अनावश्यक खर्चात कपात करत आहे. सोबतच तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी देखील उपलब्ध केली जात आहे. महाराष्ट्र सरकारने पोलीस दलातील ‘पोलीस शिपाई’ संवर्गातील 12,500 पदांच्या मेगा भरतीच्या प्रस्तावाला आज मंजूरी दिली आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे की पोलीस दलातील 12500 जागांसाठी भरती केली जाईल.

याआधी जुलैमध्ये अनिल देशमुख यांनी राज्य सरकार पोलीस दलामध्ये 12,538 पदांसाठी भरती करणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत पुर्ण प्रक्रिया पार पडेल असे त्यांनी सांगितले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि पोलिस दलावरील तणाव  कमी करण्यासाठी 10,000 शिपाई पदाची भरती केली जाणार असल्याचे म्हटले होते.

कोरोना संकटाच्या काळात एकीकडे बेरोजगारीमध्ये वाढ होत असताना सरकारच्या या मेगा भरतीमुळे तरूण-तरुणींना मोठा दिलासा मिळणार आहे.