भारताने दाखवली उदारता, नेपाळला भेट दिले रेमडिसिव्हिर औषध


भारत आणि नेपाळमध्ये मागील काही दिवसात सीमावादामुळे भलेही तणाव निर्माण झाला असला तरीही भारताना कोरोनाच्या लढाईत नेपाळसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. भारताने या महामारीच्या संकटात रुग्णांच्या उपचारासाठी 2000 पेक्षा अधिक रेमडिसिव्हिर औषधाच्या कुपी नेपाळला भेट दिल्या आहेत.

नेपाळमधील भारतीय दूतावासाद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, नेपाळमधील भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी भारतीय सरकारतर्फे नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप कुमार गायली यांना रेमडिसिव्हिरच्या 2000 कुपी सोपवल्या. कोरोना महामारीचा सामना करत असलेल्या नेपाळची भारत वारंवार मदत करत आहे. खासकरून औषध याचा महत्त्वाचा भाग आहे.

याआधी भारत सरकारने नेपाळला आयसीयू व्हेंटिलेटर दिले होते. याशिवाय अँटी-मलेरिया औषध हायड्रॉक्सीक्लोरोक्विन देखील दिले होते. दरम्यान, नेपाळमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 लाखांच्या पुढे गेला आहे व आतापर्यंत जवळपास 370 लोकांचा मृत्यू झाला आहे.