देशभरातील शेतकऱ्यांना शेती करण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी सरकारने स्माम शेतकरी योजना 2020 ची सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत, सरकार शेतकर्यांना शेतीसाठी उपकरणे खरेदी करण्यास मदत करते आणि उपकरणाच्या किंमतीच्या 80 टक्क्यांपर्यंत अनुदान देऊन आर्थिक मदत करते. या योजनेचा लाभ अधिकृत वेबसाइट https://agrimachinery.nic.in/ द्वारे घेता येतो. या योजनेंतर्गत शेतकरी सहज शेतीसाठी आवश्यक उपकरण व साधन खरेदी करू शकतील. यामुळे शेतात पिकांचे उत्पादन वाढेल आणि शेतकर्यांचे उत्पन्नही वाढेल.
स्माम शेतकरी योजना : सरकार शेतकऱ्यांना देत आहे 80% अनुदान, असा घ्या फायदा
स्माम शेतकरी योजनेचे फायदे –
- देशातील सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- याअंतर्गत शेतीची उपकरणे खरेदी करण्यासाठी 50 ते 80 टक्के सबसीडी मिळते.
- यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल, त्यानंतर त्यांना या योजनेंतर्गत सबसीडी मिळू शकेल.
- यामुळे शेतकर्यांना शेतीची उपकरणे खरेदी करणे सोपे होते.
- अत्याधुनिक उपकरणाच्या मदतीने शेतकरी अधिक चांगल्याप्रकारे शेती करू शकतील.
- योजनेचा सर्वाधिक फायदा आरक्षित (एससी, एसटी, ओबीसी) प्रवर्गातील शेतकऱ्यांना होईल.
- शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक स्थितीवर आधारित योजनेचा लाभ मिळतो.
आवश्यक कागदपत्रे –
- आधार कार्ड
- निवास प्रमाणपत्र
- ओळखपत्र
- जमिनीचा तपशील जोडताना नोंद करण्यासाठी जमिनीचा अधिकार (आरओआर)
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर
- ओळखपत्राची प्रत (आधार कार्ड / ड्रायव्हर लायसन्स / मतदान ओळखपत्र / पॅनकार्ड / पासपोर्ट)
- अर्जदार अनुसूचित जाती जमातीचा असल्यास प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
स्माम शेतकरी योजना 2020 साठी अर्ज कसा करावा?
- सर्वात प्रथम, अर्जदारास agrimachinery.nic.in या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी लागेल.
- येथे नोंदणीचा पर्याय दिसेल, ज्यामध्ये 4 पर्याय असतील. येथे तुम्हाला Farmer या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- यानंतर, आपल्यासमोर स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल. आपल्याला तेथे नोंदणी करावी लागेल.
- नोंदणी दरम्यान आपले राज्य निवडावे. आधार क्रमांक भरावा आणि सबमिट बटणवर क्लिक करावे.
- यानंतर हा फॉर्म तुमच्या स्क्रीनवर उघडेल. या फॉर्ममध्ये विचारलेल्या सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला रजिस्टरच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. अशा प्रकारे तुमची नोंदणी पुर्ण होईल.
अशी पहा उपकरण निर्माता/विक्रेत्याची यादी –
- अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या Citizens Corners च्या पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर, तुम्हाला know manufacturer/dealar details वर क्लिक करावे लागेल.
- आपल्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल, यामध्ये आपल्याला माहिती द्यावी लागेल (कोणत्या प्रकारचे शेतकरी आहात) आणि आपले राज्य निवडावे.
- सर्व माहिती भरल्यानंतर, manufacturer/dealar च्या बटणावर क्लिक करावे लागेल.
- यानंतर तुम्हाला manufacturer/dealar ची संपूर्ण माहिती मिळेल. येथून तुम्ही सबसीडीसह शेतीसाठी आवश्यक उपकरणे खरेदी करू शकता.
जर महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना योजनेच्या बाबतीत काहीही शंका असल्यास ते हेल्पलाईन नंबर 7588078456 आणि 020-26122143 वर कॉल करू शकतात.