आनंदाची बातमी! DCGI ने दिली ऑक्सफोर्डच्या कोरोना लसीचे ट्रायल करण्याची परवानगी


ब्रिटनमध्ये एक स्वयंसेवक आजारी पडल्यानंतर देशात सुरू असलेल्या ऑक्सफोर्डच्या कोरोना लसीचे ट्रायल रोखण्यात आले होते. मात्र आता ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) सीरम इंस्टिट्यूटला लसीचे क्लिनिकल ट्रायल पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. डीसीजीआयने दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील कोणत्याही स्वयंसेवकाला न निवडण्याचा आपला आदेश मागे घेतला आहे.

डीसीजीआयने परवानगी देताना ट्रायल दरम्यान अतिरिक्त काळजी घेण्यासह अन्य काही अटी देखील ठेवल्या आहेत. डीसीजीआयने सीरम इंस्टिट्यूटला प्रतिकूल स्थितीचा सामना करताना नियमांनुसार उपचाराची माहिती जमा करण्यास सांगितले आहे.

ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटी आणि अ‍ॅस्ट्रेजेनका कंपनीच्या कोरोना प्रतिबंधक लसीचे ट्रायल ब्रिटन, अमेरिका आणि भारतासह अनेक देशांमध्ये सुरू आहे. मात्र ब्रिटनमध्ये एक व्यक्ती आजारी पडल्यानंतर इतर देशातील ट्रायल स्थगित करण्यात आले होते. त्यामुळे 11 सप्टेंबरला डीसीजीआयने देखील सीरमला क्लिनिकल ट्रायल स्थगित करण्यास सांगितले होते.