लडाखनंतर अरुणाचलजवळ वाढल्या चीनच्या हालचाली, भारतीय सैन्य अलर्ट


लडाखच्या रेंजाग ला येथे घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनच्या सैन्याला भारताने हुसकावून लावले होते. यानंतर आता चीनने अरुणाचल प्रदेशमध्ये हालचाली वाढवल्या आहेत. चीन अरुणाचल प्रदेशमध्ये एलएसीवर आपल्या सैन्यासाठी तळे उभारत आहेत. भारतीय सैन्य चीन सीमेवर पिपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) हालचालींकडे लक्ष ठेवून आहे. अरुणाचल प्रदेशच्या अस्फिला, टूटिंग, चांग ज आणि फिशटेल-2 च्या पलिकडील बाजूला चीनच्या भागात हालचाली पाहण्यास मिळाली आहे. हा भाग भारतीय सीमेपासून 20 किमी अंतरावर आहे.

न्यूज18 ने दिलेल्या वृत्तानुसार, चीनी सैन्य भारतीय क्षेत्रात घुसखोरी करण्याची संधी शोधत आहे. पीएलए शांत आणि लोकसंख्या नसलेल्या भागाला आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. चीनी सैनिकांकडून घुसखोरीची शक्यता असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात भारतीय सैन्य तैनात केले आहेत.

मागील काही दिवसात एलएसीपासून काही किमीवरील भागात चीनी सैन्याच्या नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्यावरील हालचाली वाढल्या आहेत. चीनी सैनिक पेट्रोलिंग दरम्यान भारतीय भागाच्या जवळ येत आहेत. भारतीय सैन्याने या भागात जवानांना तैनात केले असून, कोणत्याही कारवाईला सडेतोड उत्तर देण्यास तयार आहे.