बिग बॉसच्या घरात होणार युट्यूबर कॅरी मिनाटीची एंट्री ?


लोकप्रिय रियालिटी शो बिग बॉसच्या 14 व्या सत्राला लवकरच सुरुवात होणार आहे. काही दिवसांपुर्वीच कार्यक्रमाचा प्रोमो व्हिडीओ रिलीज झाला होता. व्हिडीओ शेअर करत कलर्स टिव्हीने सांगितले होते की, कार्यक्रमाचा ग्रँड प्रिमियर 3 ऑक्टोंबरला असेल. या कार्यक्रमात कोण स्पर्धक असेल याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

राधे मां पासून ते अंकिता लोखंडेपर्यंत अशा अनेक नावांची सध्या चर्चा सुरू आहे. मात्र आता प्रसिद्ध युट्यूबर कॅरी मिनाटी हा सलमानच्या शो चा भाग होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. एनडीटिव्हीच्या रिपोर्टनुसार, कॅरी मिनाटी बिग बॉसच्या घराचा भाग बनणार आहे. याबाबतची माहिती समोर आल्यानंतर ट्विटरवर कॅरी मिनाटी ट्रेंड करत आहे.

रिपोर्टनुसार, कॅरी मिनाटी सध्या क्वारंटाईन असून, 14 दिवसानंतर रियालिटी शो मध्ये भाग घेणार आहे. बिग बॉसच्या घरात जाणाऱ्या सर्व 14 स्पर्धांची मेडिकल चाचणी होणार आहे व शूटिंगच्या आधी सर्व क्वारंटाईन असतील.

दरम्यान, कॅरी मिनाटीच्या नावाबाबत अद्याप अधिकृतरित्या माहिती देण्यात आलेली नाही. बिग बॉस 14 मध्ये सहभागी होणाऱ्यांमध्ये नैना सिंह, जॅस्मिन भसीन, निशांत संह मल्कानी, शगुन पांडे, पवित्रा पुनिया, कुमार जानू, सारा गुरपाल यांच्या नावाचा खुलासा झाला आहे.