रियाची लायकी काढणारे बिहार डीजीपी गुप्तेश्वर पांडे दिसणार ‘रॉबिनहूड’ अवतारात


सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीची लायकी काढल्यामुळे चर्चेत आलेले बिहार पोलीस डीजीपी गुप्तेश्वर पांडे लवकरच बिग बॉस फेम दीपक ठाकुरच्या गाण्यात झळकणार आहेत. डीजीपी गुप्तेश्वर पांडे दीपक ठाकुरच्या म्यूझिक अल्बममध्ये रॉबिनहूडच्या भूमिकेत दिसतील.

या गाण्याचे नावच रॉबिनहूड बिहार के असे असून, दीपकने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. म्यूझिक व्हिडीओत गुप्तेश्वर पांडे यांच्यासोबत दीपक ठाकूर देखील दिसणार आहे.

डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांना या नव्या अवतारात पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहे. नेटकऱ्यांना त्यांचा हा रॉबिनहूड अवतार खूपच आवडला आहे.

दरम्यान, फेम इंडिया नावाच्या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात गुप्तेश्वर पांडे यांनी देशातील 50 सर्वाधिक चर्चीत भारतीयांच्या यादीत टॉप-10 मध्ये स्थान मिळवले आहे. सुशांत प्रकरणात आपल्या वक्तव्यांमुळे ते महाराष्ट्रात चर्चेत आले होते. तर दुसरीकडे दीपक ठाकूरला गँग्स ऑफ वासेपुर चित्रपटातील मूरा गाणे गायल्यानंतर प्रसिद्धी मिळाली होती. तो बिग बॉसमध्ये देखील दिसला होता.