शरीरातील ऑक्सिजन पातळी मोजणारे दमदार ‘अ‍ॅपल वॉच सीरिज 6’ लाँच


अ‍ॅपलने आपल्या बहुप्रतिक्षित अ‍ॅपल वॉच सीरिज 6 वरील पडदा आज हटवला आहे. हार्डवेअरच्या बाबतीत या वॉचमध्ये अनेक बदल करण्यात आलेले आहे. परफॉर्मेंस, रेसिस्टेंस आणि इनहांस्ड वायरलेस कनेक्टिव्ही यात मिळेल. या वॉचद्वारे ब्लड ऑक्सिजन लेव्हल मॉनिटर करता येणार आहे. अ‍ॅपल वॉच सीरिज 6 ची भारतातील किंमत 40,900 रुपयांपासून सुरू होते. तर जीपीएस + सेल्यूलर व्हेरिएंटची किंमत 49,900 रुपये आहे. दोन्ही व्हेरिएंटचे 40 एमएम आणि 44 एमएम मॉडेल आहेत. हे स्मार्टवॉच भारतात कधी उपलब्ध होईल याची अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

Image Credited – The Verge

स्पेसिफिकेशनबद्दल सांगायचे तर दोन्ही मॉडेल सेरामिक आणि क्रिस्टल बॅक फिनिशिंगसोबत येतात. यात अ‍ॅल्यूमेनियम, स्टेनलेस स्टील, टायटेनियम आणि सेरामिक मेटेरियल्सचा वापर झाला आहे. स्मार्टवॉचमध्ये अ‍ॅपल एस6 iP (system in package) प्रोसेसर मिळेल. याशिवाय स्मूथ कनेक्शनसाठी डब्ल्यू3 वायरलेस चिपसेट मिळेल. या स्मार्टवॉचमध्ये ऑल्वेज ऑन रेटिना डिस्प्लेचा वापर केला आहे. याचे रिफ्रेश रेट 60 हर्टज आहे. डिस्प्लेची सर्वाधिक ब्राइटनेस 1000 नीट्स असल्याचा दावा करण्यात आला आहे. 40mm मॉडेलमध्ये 324×394 पिक्सल रिझॉल्यूशन आहे, तर 44 एमएम व्हेरिएंटचे रिझॉल्यूशन 368×448 पिक्सल आहे.

Image Credited – livemint

फिटनेस ट्रॅकिंगसाठी असलेल्या अ‍ॅपल वॉच सीरिज 6 युजर्सचे ऑक्सिजनची पातळी देखील मोजणार आहे. नवीन हेल्थ सेंसरद्वारे हे शक्य होईल. ऑक्सिजनची पातळी 95 ते 100 टक्क्यांच्या रेफ्रेंस फीगर खाली गेल्यास युजर्सला अलर्ट केले जाईल. यात इलेक्ट्रिक हार्ट सेंसर देखील देण्यात आलेले आहे. कंपनीचा दावा आहे की वॉच सीरिज 6 मध्ये 6 ते 18 तासांची बॅटरी लाईफ मिळेल.

अ‍ॅपल वॉच एसई –

याशिवाय कंपनीने अ‍ॅपल वॉच एसएई देखील लाँच केले असून, याची किंमत 29,900 रुपयांपासून सुरू आहे. हे स्मार्टवॉच भारतात कधी उपलब्ध होईल याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. यात देखील सीरिज 6 प्रमाणे एक्सेलेरोमीटर, जायरोस्कोप आणि ऑल्वेज ऑन ऑल्टीमीटर मिळेल. मात्र यात ऑल्वेज ऑन रिटेना डिस्प्ले देण्यात आलेला नाही.

Image Credited – CNet

युजर्सला अ‍ॅपल वॉच एसईमध्ये हार्ट रेट मॉनिटर मिळेल. फॉल डिटेक्शन, इमर्जेंसी एसओएस, इंटरनेशनल इमर्जेंसी कॉलिंग आणि अन्य काही महत्त्वाचे फीचर देखील मिळतील. मात्र यात ब्लड ऑक्सिजन आणि ईसीजी सारखे फीचर नाहीत.

दरम्यान, कंपनीने आयपॅड एअर (4th Gen) आणि आयपॅड (8th Gen) वरील देखील पडदा हटवला आहे. याशिवाय अ‍ॅपलच्या सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘अ‍ॅपल वन’ ही सेवा लाँच केली आहे.