या देशात लठ्ठ मुलींनाच मिळते विवाहासाठी पसंती

फोटो सौजन्य न्यूझील

सर्व साधारणपणे कुठल्याही विवाहेच्छू मुलाला तुला कशी बायको आवडेल असे विचारले तर तर तो नक्कीच सुंदर, सडपातळ अश्या अपेक्षा व्यक्त करेल. जगभरातील तरुण याला अपवाद नसतील. पण जगभरात अनेक देशात विवाहांसंदर्भात अनेक विचित्र प्रथा आहेत. त्या त्या देशांच्या विवाह परंपरा, पद्धती, संस्कृती विभिन्न आहेत. उत्तर आफ्रिकेच्या पश्चिम भागातील एक देश आहे मोरोटानिया. या देशात मुली लठ्ठ असतील तरच त्याचे विवाह चटकन जमतात. मुली सडपातळ राहिल्या तर त्यांना वर मिळत नाहीत.

मोरोटानिया देशात ही प्रथा पूर्वीपासून आहे. यामुळे येथे मुलींना खास आहार बालपणापासून दिला जातो. जगभरात सर्वत्र मुलीना कमी आणि मुलांना अधिक आहार देण्याची प्रथा अनेक ठिकाणी असताना येथे मात्र मुलीना मुलांपेक्षा अधिक आहार दिला जातो. यामुळे मुली विवाहाचे वय होईपर्यंत लठ्ठ होतात. येथे लठ्ठपणा हे समृद्धी आणि सौंदर्याचे लक्षण मानले जाते. सडपातळ मुलीना गरीब आणि कमनशिबी मानले जाते.

फोटो सौजन्य आरटीए

मुलीना लठ्ठ बनविण्यासाठी येथे अवैध फॅटनिंग फार्म चालविले जातात. ५ -६ वर्षाच्या मुलीना येथे पाठविले जाते. त्यांना सकाळपासून रात्रीपर्यंत नुसते खायला घातले जाते. त्यात भात, ऑलीव्ह, खजूर, बकरी- उंटाचे दुध असे पदार्थ दिले जातात. मुलींनी खायचे, आराम करायचा, पुन्हा खायचे हाच कार्यक्रम असतो. दररोज या छोट्या मुलीना १ हजार पेक्षा जास्त उष्मांक मिळतील असा आहार दिला जातो.

मोरोटानियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या रिपोर्ट नुसार आता या परिस्थितीत हळू हळू बदल घडू लागला असून ही परंपरा पाळणाऱ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. पुरुष आणि महिला दोघांनाही स्लीम आणि हेल्दी असण्याचे फायदे कळू लागले आहेत.