टाटांची अल्ट्रोझ बनली आयपीएल २०२०ची सहयोगी

फोटो सौजन्य ऑटोफेअर

टाटा मोटर्सने कंपनीची अल्ट्रोझ ड्रीमवन आयपीएल २०२० साठी अधिकृत सहयोगी असल्याची घोषणा केली आहे. आयपीएल २०२० स्पर्धेत सर्वाधिक स्ट्राईक रेट असणाऱ्या फलंदाजाला ही कार बक्षीस दिली जाणार आहे. १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये आयपीएलची सुरवात होत आहे. टाटा मोटर्स आणि बीसीसीआय मध्ये सलग तिसऱ्या वर्षी हा सहयोग झाला आहे. यापूर्वी २०१८च्या आयपीएल मध्ये टाटा मोटर्सने त्यांची नेक्सॉन व २०१९ आयपीएल मध्ये हॅरियर या कार्स अधिकृत सहयोगी म्हणून दिल्या होत्या.

आयपीएल २०२० स्पर्धा दुबईत तीन विविध ठिकाणी होणार आहेत. त्या त्या स्टेडियम मध्ये अल्ट्रोझ शोकेस केली जाणार आहे. या स्पर्धेत अल्ट्रोझ सुपर स्ट्रायकर अॅवॉर्ड सुद्धा दिली जाणार आहेत. प्रत्येक  सामन्यात बेस्ट स्ट्राईक रेट असलेल्या खेळाडूला अल्ट्रोझ सुपर स्ट्राईक ट्रॉफीसह १ लाख रुपये बक्षीस दिले जाणार आहे. याचबरोबर टाटाचे डीलर्स आणि सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर खेळाची मजा ग्राहकांपर्यंत पोहोचविली जाणार आहे. फॅन्स साठी सुद्धा अल्ट्रोझ सुपर स्ट्राईकर मोबाईल गेम असून त्यांना सुपर स्ट्राईकर बनायची संधी मिळणार आहे.

टाटा मोटर्स प्रवासी वाहन विभाग प्रमुख विवेक श्रीवत्स म्हणाले आयपीएल हा आमच्यासाठी महोत्सव असून देशातील जनतेसाठी सुद्धा तो सण उत्सव आहे. आमची अल्ट्रोझ सर्व बाबतीत गोल्ड स्टँडर्ड ठरली आहे.