मौलाना मसूद अझहर राम मंदिर हल्ल्याच्या तयारीत

फोटो सौजन्य इंडिअन डिफेन्स न्यूज

जगातील अनेक देशांचा मोस्ट वॉंटेड दहशतवादी मौलाना मसूद अजहर भारतात अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या राम मंदिरावर हल्ला करण्याची योजना आखत असल्याचे स्पष्ट झाले आहे. झी न्यूजने या संदर्भात दिलेल्या माहिती नुसार करोना काळात सुद्धा पाकिस्तानात दहशतवादी खुलेपणाने फिरत आहेत आणि अतिरेक्यांची भरती करत आहेत. पाक टेरर फॅक्टरी नावाने ओळखल्या जाणाऱ्या जैश मोहमद आणि जमात उल दावा संघटना पाकिस्तानात बसून राम मंदिर तसेच दिल्ली आणि मुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ले करण्याच्या योजना आखत आहेत.

जानेवारी ते ऑगस्ट या काळात अनेक व्हिडीओ संदेश प्रसारित झाले आहेत त्यातून ही माहिती मिळाली आहे.पाकिस्तानच्या मोठ्या शहरातून मसूद मोठमोठ्या सभा घेत आहे. सध्याच्या घडीला पाकिस्तानात ४० हजार दहशतवादी असून त्यातील सोळांना संयुक्त राष्ट्राने अंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले असून त्यातील बरेच जमात उल दावा आणि जैश मोहमद संघटनेचे आहेत. या दोन्ही संघटनावर जगभर बंदी आहे. पाकिस्तान मध्ये मात्र या संघटनेतील अतिरेकी उघड फिरताना दिसत आहेत.

५ ऑगस्ट रोजी जेव्हा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमीपूजन झाले त्याच दिवशी मसूदने बाबरी मशिदीत नमाज पढण्याची इच्छा व्यक्त करून मंदिर उभारणी रोखण्यासाठी त्याचे सहकारी जीवाची बाजी लावण्यास तयार असल्याचे जाहीर केले होते. मसूद पुलवामा, पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्यांचा मास्टर माईंड आहे. लॉक डाऊन काळात जगभरातील दहशतवाद्यांसाठी ऑनलाईन डिजिटल वर्कशॉप घेतली गेल्याचेही सांगितले जात आहे.

जगाच्या पाठीवर पाकिस्तान हा असा एकमेव देश आहे जेथे मशिदीत नमाज पढताना एके ४७ रायफल नेता येतात. मसूद जेव्हा नमाज पढायला जातो तेव्हा त्याच्या संरक्षणासाठी एके ४७ घेतलेले तीन सुरक्षा रक्षक असतात.. या संदर्भात अनेक व्हिडीओ प्रकाशित झाले आहेत.