सिगरेटच्या थोटक्यांपासून ही कंपनी बनवते विविध वस्तू, 1000 जणांना दिला रोजगार


धुम्रपान करणे आरोग्यासाठी धोकादायक आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तरी देखील अनेकजण या व्यसनावर दररोज शेकडो रुपये वाया घालवतात. सिगरेट ओढल्यानंतर त्याचे राहिलेले बट अर्थात थोटके जमिनीवर तसेच टाकून दिले जातात व यामुळे पर्यावरणावर परिणाम होतो. मात्र याच सिगरेटच्या थोटक्यांपासून एक यशस्वी कंपनी उभी राहिली आहे.

नोएडा येथे राहणाऱ्या 27 वर्षीय नमन नावाच्या तरुणाने एक कोड एंटरप्राइजेस नावाने एक कंपनी स्थापन केली असून, जी सिगरेटच्या थोटक्यांपासून अनेक वस्तूंची उत्पादन करते. नमनने सिगरेट वेस्ट मॅनेजमेंट आणि रिसायकलिंगवर काम केले. नमनची कंपनी देशाच्या वेगवेगळ्या राज्यातून थोटके गोळा करत व त्याला रिसायकल करते. या थोटक्यांना रिसायकल करून मॉस्किटो रिपलेंट, उशी, कुशन, टेडी, की-चेन सारखे वस्तू बनवतात. कंपनीने आतापर्यंत 300 मिलियन पेक्षा अधिक थोटके रिसायकल केले आहे.

Image Credited – livemint

नमनने सांगितले की, जेव्हा तो पीजी मध्ये राहत असे, त्यावेळी पाहिले की तरुण भरपूर सिगरेट ओढत असे. ते सिगरेटचे तुकडे कोठेही फेकून देत असे. त्यानंतर संशोधन केल्यावर समजले की ते तुकडे डी-कंपोज होण्यासाठी 10 वर्ष लागतात. थोटक्याच्या खालील भागात पॉलिमर अथवा फायबर मटेरियल असते. रिसर्च केल्यावर त्याच्या लक्षात आले की रियालकलकरून बायोप्रोडक्ट बनवता येतात.

यानंतर त्यांनी एक कंपनी स्थापन करत, थोटक्यांपासून बायोप्रोडक्ट तयार करण्यास सुरुवात केली. नमन या वस्तूंची ऑनलाईन विक्री करतात. त्याच्या कामात जवळपास 1000 लोक जोडलेले आहेत. एवढेच नाही तर त्याने 40 महिलांना रोजगार देखील दिला आहे.