‘चीनने लॅबमध्ये तयार केला कोरोना’, पहिल्यांदाच वैज्ञानिकांनी दिला पुरावा


भितीने चीनसोडून अमेरिकेत राहत असलेल्या एका चीनी वैज्ञानिकाने दावा केला होता की कोरोना व्हायरस चीनच्या लॅबमध्ये तयार करण्यात आलेला आहे. आता त्याच महिला वैज्ञानिकाने आणखी तीन संशोधकांसोबत मिळून पुरावा सादर केला आहे. डॉक्टर ली मेंग यान नावाच्या या वैज्ञानिकाने एका मुलाखतीत म्हटले होते की, कोरोना लॅबमध्ये तयार झाल्याचे आपल्याकडे पुरावे आहेत.

हाँगकाँग यूनिव्हर्सिटीमध्ये काम करताना यान या कोरोनावर संशोधन करणाऱ्या सुरुवातीच्या वैज्ञानिकांपैकी एक आहेत. त्यांनी ओपन एक्सेस रिपोजिटरी वेबसाईट Zenodo वर व्हायरसशी संबंधिंत पुरावे प्रकाशित केले आहेत. यान म्हणाल्या होत्या की, कोरोना व्हायरसच्या जीनोनमधील असामान्य फीचरद्वारेच समजते की हा व्हायरस लॅबमध्ये तयार करण्यात आला आहे.

ली मेंग यान म्हणाल्या की, नैसर्गिकरित्या व्हायरस पसरल्याच्या गोष्टीला लोकांनी स्विकार केले आहे. मात्र याबाबतच पुरेस पुरावे नाहीत. दुसरी थेअरी व्हायरस चीनच्या लॅबमधून बाहेर आला. व्हायरसमधील बायोलॉजिकल गुण नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या व्हायरसप्रमाणे नाहीत.

यान यांनी आपल्या रिपोर्टमध्ये जीनोमिक, स्ट्रक्चरल, मेडिकल, लिटरेचरवर आधारित पुरावे सादर केले आहेत. यान यांच्यानुसार, या सर्व गोष्टींना एकत्रित करून पाहिल्यास आढळते की हा व्हायरस निसर्गातून मनुष्यात आला आहे. पुरावे सांगतात की वटवाघुळ कोरोना व्हायरस ZC45 किंवा ZXC21 च्या टेंपलेटद्वारे व्हायरसला लॅबमध्ये बनवले आहे. 6 महिन्यात या प्रकारचा व्हायरस तयार करणे शक्य आहे.