लोन मोरेटोरियमनंतर आता एसबीआय सुरू करणार ‘ही’ विशेष सेवा


भारतीय स्टेट बँक (एसबीआय) आपल्या सर्व किरकोळ कर्जाची पुनर्रचना करण्यासाठी लवकरच डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करणार आहे. या पोर्टलद्वारे ग्राहक कर्जाच्या पुनर्रचनेसाठी अर्ज करू शकतील. यामध्ये ग्राहक कर्ज पुनर्रचनेसाठी आपण पात्र आहोत का हे देखील पाहू शकतील. 24 सप्टेंबरपासून एसबीआय ही सेवा सुरू करण्याची शक्यता आहे.

न्यूज18 च्या वृत्तानुसार, कर्ज पुनर्रचनेचा कालावधी हा 6 महिन्यापासून ते 2 वर्षांपर्यंत असेल. एसबीआयच्या ग्राहकांची संख्या 2 कोटी असून, ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. बँक कॉर्पोरेट आणि एमएसएमई ग्राहकांकडून कर्जाच्या पुनर्रचनेसाठी अर्ज शाखेत स्विकारणे देखील सुरू ठेवणार आहे.

एसबीआयचे चेअरमन रजनीश कुमार म्हणाले की, आमचे 30 लाख गृहकर्ज घेणार ग्राहक आहेत. पुनर्रचनेसाठी पात्र आहोत की नाही ही प्रक्रिया ऑटोमॅटिक असेल. या प्रक्रियेला मॅन्युअली करू शकत नाही. त्यांनी सांगितले की, सिस्टम ग्राहकांची सध्याचे उत्पन्न आणि पुढील काही महिन्यातील अंदाजित उत्पन्न तपासेल. याच्या आधारावर 12 महिने ते 2 वर्षांपर्यंत मोरेटोरियमचा सल्ला देईल.

रिस्ट्रक्चरिंगच्या कर्जात रीपेमेंटचा कालावधी वाढवता येतो. यासोबतच व्याज देण्यासंदर्भात देखील बदल करता येतो. पुनर्रचनचा पर्याय हा सर्वात शेवटचा पर्याय असतो. कर्ज घेणाऱ्याकडून डिफॉल्टचा धोका असल्यासच असे केले जाते.