केंद्र सरकार आपल्या 20 कंपन्या आणि त्यांच्या यूनिट्समधील हिस्सेदारी विकण्याच्या तयारीत आहेत. सोबतच सरकार 6 कंपन्या बंद करण्याचा देखील विचार करत आहे. ज्या कंपन्या बंद करण्याचा सरकार विचार करत आहे त्यामध्ये हिंदुस्तान फ्लोरोकार्बन लिमिटेड (एचएफएल), स्कूटर्स इंडिया, भारत पंप्स अँड कम्प्रेसर्स लिमिटेड, हिंदुस्तान प्रीफॅब, हिंदुस्तान न्यूजप्रिंट आणि कर्नाटक अँटीबायोटिक अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेडचा समावेश आहे.
स्कूटर्स इंडियासह ‘या’ 6 सरकारी कंपन्या बंद करण्याच्या तयारीत सरकार
अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत लिखित उत्तर देत सांगितले की, या कंपन्यांमध्ये निर्गुंतवणकीची प्रक्रिया वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आहे.
याशिवाय प्रोजेक्ट अँड डेव्हलपमेंट इंडिया लिमिटेड, इंजिनियरिंग प्रोजेक्ट (इंडिया) लिमिटेड, ब्रिज अँड रूफ कंपनी इंडिया लिमिटेड, यूनिट्स ऑफ सीमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (सीसीआय), सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (बीईएमएल), फॅरो स्क्रॅप निगम लिमिटेड आणि एनडीएमसीच्या नागरनार स्टील प्लांट ऑफमध्ये निर्गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू आहे.
याशिवाय एलॉय स्टील प्लांट, दुर्गापूर, सेलम स्टील प्लांट, सेलचे भद्रावती युनिट, पवन हंस, एअर इंडिया व त्याच्या 5 सहाय्यक कंपनीचा विक्रीमध्ये समावेश आहे. तसेच, एचएलएफ लाईफ केअर लिमिटेड, इंडियन मेडिसन अँड फार्मास्यूटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड, आयटीडीसीचे विविध यूनिट्स, हिंदुस्तान अँटीबायोटिक्स, बंगाल केमिकल्स अँड फार्मास्यूटिकल, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि नीलाचल इस्पात निगम लिमिटेटची देखील हिस्सेदारी विकली जाणार आहे.