राज्यसभेने आज विमान (दुरुस्ती) विधेयक, 2020 (The Aircraft (Amendment) Bill, 2020) ला मंजूरी दिली आहे. हे विधेयक 1934 च्या कायद्याची जागा घेईल. आता उड्डाणावेळी नियमांचे उल्लंघ केल्यास विमानावर 1 कोटींचा दंड लावला जाईल, जो आतापर्यंत 10 लाख रुपये होता. हा दंड सर्व हवाई उड्डाणांवर लागू असेल.
उड्डाणावेळी नियमांचे उल्लंघन केल्यास विमानावर लागणार 1 कोटी रुपयांचा दंड, विधेयकला मंजूरी
हे संशोधन देशातील नागरी उड्डाण संचालनालयाच्या तीन नियामक संस्था डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एविएशन, ब्यूरो ऑफ सिव्हिल एविएशन सिक्युरिटी आणि एअरक्राफ्ट एक्सिडेंट इन्वेस्टिगेशनला ब्यूरोला प्रभावशाली बनविण्यास मदत करेल. हे संशोधन सिव्हिल एविएशन आंतरराष्ट्रीय नागरी विमानचालन संस्थेच्या नियमांना देखील पुर्ण करण्याचे काम करेल. यामुळे देशातील विमान सेवेची सुरक्षा वाढेल.
दरम्यान, डीजीसीएने मागील आठवड्यात नवीन नियमावली जारी करत शेड्यूल फ्लाइट्समध्ये उड्डाण घेताना आणि विमान लँड करताना बोनाफाइड प्रवासी (विमानात असताना) फोटोग्राफी करू शकतात.