‘आजपासून मी भाजप-आरएसएस सोबत’, राज्यपालांच्या भेटीनंतर माजी नौदल अधिकाऱ्याची मुख्यमंत्र्यांवर टीका


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र शेअर केल्यामुळे शिवसैनिकांनी माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केली होती. आज मदन शर्मा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत, न्यायाची मागणी केली. राज्यपालांच्या भेटीनंतर शर्मा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पदावरून हटवून राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी देखील केली.

मदन शर्मा म्हणाले की, भाजपशी संबंधित असल्याचा आरोप करत मला मारहाण करण्यात आली होती. परंतू मी आजपासून भाजप-आरएसएससोबत असल्याची घोषणा करतो. त्यांनी राज्यपालांना सांगितले की, शिवसैनिकांवर लावण्यात आलेले गुन्ह्याची कलमे कमकुवत आहेत. राज्यपालांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिले असल्याचे देखील ते म्हणाले.

मदन शर्मा म्हणाले की, मी राज्यपालांकडे मागणी केली की महाराष्ट्रात राज्य सरकार हटवून राष्ट्रपती राजवट लागू करावी. हा विषय केंद्रासमोर म्हणणे मांडणार असल्याचे राज्यपालांनी आश्वासन दिले आहे.