संयुक्त राष्ट्रात भारताची चीनला पटखनी, या प्रतिष्ठित संस्थेचा बनला सदस्य


भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनला मोठा धक्का दिला आहे. भारताने संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या (ECOSOC) संस्थेत स्थान मिळवले आहे. भारताची यूनायडेट नेशन्स कमिशन ऑन स्टेटस ऑफ वूमनचे सदस्य म्हणून निवड झाली आहे.

या संस्थेचा सदस्य बनण्यासाठी भारतासोबत अफगाणिस्तान आणि चीन हे देश शर्यतीत होते. भारत 4 वर्ष महिलांच्या स्थितीवर काम करणाऱ्या आयोगाचा सदस्य राहणार आहे.

संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती यांनी ट्विट करत माहिती दिली की, भारताने प्रतिष्ठित ECOSOC च्या संस्थेत स्थान मिळवले आहे. भारताला कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनचा (सीएसडब्ल्यू) सदस्य निवडण्यात आले आहे. हे लैंगिक समानात आणि महिला सशक्तीकरणला प्रोत्साहन देण्याच्या आपल्या प्रतिबद्धतेला दर्शवते. आम्ही सदस्य देशांचे पाठिंबा देण्यासाठी आभार मानतो.

भारत कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनचा पुढील 4 वर्ष (2021 ते वर्ष 2025) सदस्य राहिल.