चीनने अमेरिकन स्पेस इंडस्ट्रीला मागे टाकत नवीन कामगिरी केली आहे. चीनने तरंगणारे स्पेसपोर्ट तयार केले आहे. म्हणजेच आता चीन जहाजातून अंतराळात जाणारे रॉकेट्स लाँच करू शकणार आहे. या स्पेसपोर्टचा उपयोग करून चीन प्रशांत महासागरातून रॉकेट लाँच करू शकतो. जेणेकरून सेटेलाईट्सला अंतराळात कमी वेळेत पोहचवता येईल. चीनने या स्पेसपोर्टला ईस्ट एअरोस्पेस पोर्ट असे नाव दिले आहे. याचे परीक्षण यशस्वीरित्या पार पडले.
चीनने अमेरिकेला टाकले मागे, बनवले रॉकेट लाँचिंगसाठी तरंगणारे स्पेसपोर्ट

हे स्पेसपोर्ट चीन एअरोस्पेस सायन्स अँड टेक्नोलॉजी कॉर्पेने (सीएएससी) बनवले आहे. भविष्यात चीन आपले अनेक महत्त्वपुर्ण प्रोजेक्ट्स या स्पेसपोर्टवरून लाँच करणार आहे. येथून छोटे रॉकेट, हलके अंतराळ वाहन, सेटेलाईट्स आणि अन्य अंतराळ तंत्रज्ञानांचे लाँचिंग व परीक्षण करता येईल. आज स्पेसपोर्ट्सवर लाँग मार्च – 11 रॉकेट लाँच करण्यात आले. यात 9 सेटेलाईट्स होते. हे लाँचपँडचे एक परीक्षण होते, जे यशस्वीरित्या पार पडले.

चायना अॅकेडमी ऑफ लाँच व्हिकल टेक्नोलॉजीचे प्रमुख वांग जियाओजुन म्हणाले की, आम्ही एक मोठी कामगिरी केली आहे. यासोबतच चीनकडे अंतराळात रॉकेट लाँच करण्यासाठी आता 5 लाँच साइट्स आहेत. समुद्रातून रॉकेट लाँच करणे हे नवीन तंत्रज्ञान आहे.
अमेरिकन स्पेस टेक्नोलॉजी कंपनी स्पेस एक्सने देखील घोषणा केली होती की, ते तरंगणाऱ्या लाँचपॅडवरून स्टारशिपला लाँच करणार आहे. मात्र अद्याप त्यांचे तरंगणारे लाँचपॅड तयार झालेले नाही. चीनचे जमिनीवरील लाँच पॅड शिचांग (दक्षिण-पश्चिम), जिउकुआन (उत्तर-पश्चिम), ताइयुआन (उत्तर) आणि हेनान बेटाजवळ आहे.