5.9 एकर जमीन, 142 कोटी बजेट… असे असेल आग्र्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचे म्यूझियम


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्रा येथे तयार होत असलेल्या मोगल म्यूझियमला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात येत असल्याची घोषणा केली होती. गुलामीची मानसिकता असलेली प्रतीके सोडून राष्ट्राचा गौरव असलेल्या विषयांना चालना देण्यास आमचे प्राधान्य असल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले.

हे म्यूझियम ताज महालच्या पुर्व गेट रोडवर बनत आहे. हा संपुर्ण प्रोजेक्ट 5.9 एकर जमिनीवर उभा राहणार आहे व याचे बजेट 142 कोटी रुपये आहे. 2017 च्या आधी तत्कालिन अखिलेश यादव यांच्या सरकारने म्यूझियमच्या निर्मितीचे काम सुरू केले होते. उत्तर प्रदेशच्या पर्यटन विभागाला हे म्यूझियम उभारण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. याचे 40 टक्के काम पुर्ण झालेले आहे व याच वर्षी संपुर्ण काम पुर्ण करण्याचा उद्देश आहे.

आग्रा संग्रहालयाला छ.शिवाजी महाराजांचे नाव- योगी आदित्यनाथ यांची घोषणा

म्यूझियममध्ये काय असेल ?

आग्र्याचा इतिहास मुघल काळाशी संबंधित आहे. त्यामुळे यात ताज महल, लाल किल्ला आणि त्यासंबंधित गोष्टी दिसतील. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वस्तू देखील येथे पाहण्यास मिळतील. मुघलकाळातील ऐतिहासिक वस्तू कागदपत्रे, महाकवी सुरदास यांच्याशी संबंधी कागदपत्रे देखील येथे पाहता येतील.

शिवाजी महाराजांची आग्र्याला भेट आणि त्यानंतर तेथून सुटका हा मराठ्यांच्या इतिहासातील एक महत्त्वाचा प्रसंग मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्यात कैद करण्यात आले व त्यानंतर त्यांनी  युवराज संभाजी व स्वतःची चातुर्याने केलेली सुटका सर्वज्ञात आहे. हेच शिवाजी महाराज आणि आग्र्याचे कनेक्शन आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने मुघल म्यूझियमचे नाव बदलून त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय घेतला.