आयपीएल २०२० – महागड्या खेळाडूत ७ भारतीय

संयुक्त अरब अमिराती मध्ये १९ सप्टेंबर पासून सुरु होत असलेल्या १३ व्या आयपीएल सिझन साठी सर्व टीम सज्ज झाल्या असून जोरदार सराव करत आहेत. या सिझन मध्ये १५ खेळाडूंना १० कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळणार असून त्यात ७ भारतीय खेळाडू आहेत. आयपीएल २०२० रिटेन केलेले व ऑक्शन मध्ये मोठी रक्कम मिळविलेले हे १५ खेळाडू आहेत. वास्तविक ही संख्या १६ होती पण सुरेश रैना याने या आयपीएल मध्ये न खेळण्याचा निर्णय घेतल्याने ही संख्या १५ वर आली. सुरेश रैना याला ११ कोटी सॅलरी मिळणार होती.

टॉप १५ खेळाडू मध्ये ७ भारतीय, चार ऑस्ट्रेलियाचे, दोन दक्षिण आफ्रिकेचे व वेस्ट इंडीज आणि इंग्लंडचा प्रत्येकी १ खेळाडू आहे. भारतीय टीम मध्ये पहिल्या नंबरवर विराट कोहली असून त्याला १७ कोटी रुपये मिळणार आहेत. धोनी, रोहित शर्मा, रिषभ पंत याना १५ कोटी मिळणार आहेत. के. एल राहुल, हार्दिक पांड्या, मनिष पांडे याना साडेबारा ते अकरा लाख रुपये मिळणार आहेत. ऑस्ट्रेलियाच्या पेट कमिन्स याला साडे पंधरा कोटी रुपये मिळणार असून तो विराट नंतर सर्वाधिक पैसे मिळविणारा खेळाडू आहे.