आग्रा संग्रहालयाला छ.शिवाजी महाराजांचे नाव- योगी आदित्यनाथ यांची घोषणा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतलेल्या आग्रा विकास कार्यक्रमात आग्रा येथे तयार होत असलेल्या मोगल म्युझियमला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले आमचे नायक मुघल होऊ शकत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज हेच आमचे नायक आहेत.

योगी म्हणाले उत्तर प्रदेश सरकार राष्ट्रवादी विचारांना प्रोत्साहन देते. गुलामीची मानसिकता असलेली प्रतीके सोडून राष्ट्राचा गौरव असलेल्या विषयांना चालना देण्यास आमचे प्राधान्य आहे. गेल्या काही दिवसात देशात स्मार्ट सिटी रँकिंग मध्ये आग्रा राष्ट्रीय स्तरावर तीन नंबरवर तर उत्तर प्रदेशात १ नंबरवर आले आहे. स्मार्ट सिटी संदर्भातील कामे झपाट्याने पूर्ण केली जात आल्याचे सांगून योगी म्हणाले, शहर विकासाचा पैसा जनतेच्या कष्टाचा आहे त्यामुळे पै पैच सदुपयोग करण्याबाबत आम्ही दक्ष आहोत.