कंगना मनालीला परतली, जाताना पुन्हा केली मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना


अभिनेत्री कंगना राणावत आज मुंबईवरून पुन्हा मनालीला परतली आहे. मात्रा जाताजात तिने शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. सोबतच आपल्यासोबत घडलेल्या अन्यायाबाबत मत मांडले आहे. एका महिलेला घाबरवून शिवसेना आपल्या पक्षाची प्रतिमा मलीन करत असल्याचे देखील कंगनाने म्हटले आहे.

कंगनाने लिहिले की, जड मनाने मी आज मुंबई सोडत आहे. ज्या प्रकारे मागील काही दिवसात हल्ल्यांनी मला घाबरवण्यात आले, शिव्या देण्यात आल्या, माझ्या ऑफिसनंतर घर तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुरक्षारक्षक घातक शस्त्र घेऊन माझी सुरक्षा करत आहे. मला सांगावेसे वाटते की माझे पीओके बाबतचे मत एकदम अचूक होते.

शिवसेनेवर निशाणा साधत कंगना म्हणाली की, जेव्हा एक संरक्षकच भक्षक असल्याची घोषणा करत आहे, मगर बनून लोकशाहीचे चीरहरण करत आहे. मला कमकुवत समजून खूप मोठी चूक करत आहे. एका महिलेला घाबरवून, तिचा खालीपणा करून, आपल्याच प्रतिमेला मलीन करत आहे.

दरम्यान, आज 4 दिवसानंतर कंगना आपल्या गावी हिमाचल प्रदेशला रवाना झाली आहे. कंगनाने मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केल्याने मोठे वादंग उठले होते. यानंतर बीएमसीने तिच्या ऑफिसवर कारवाई देखील केली होती.