पदवीधरांसाठी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, 2500 जागांसाठी भरती


कोणत्याही विषयीतील पदवीधर उमेदावारासाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. खासकरून बँकेत नोकरी करण्यास इच्छूक असणारे या संधीचा फायदा घेऊ शकतात. इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सेलेक्शन (आयबीपीएस) देशभरातील विविध सरकारी बँकांमध्ये क्लर्क पदासाठी हजारो जागांची भरती करणार आहे.

यासाठी नॉटिफिकेशन जारी करण्यात आले असून, एकूण 2556 जागांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 371 पदांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 2 सप्टेंबर 2020
  • ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख – 23 सप्टेंबर 2020
  • अर्जाची फी भरण्याची अंतिम तारीख – 23 सप्टेंबर 2020
  • कॉल लेटर डाऊनलोड करण्याची तारीख – 18 नोव्हेंबर 2020
  • पुर्व परीक्षा – 5, 13 आणि 13 डिसेंबर 2020
  • पुर्व परीक्षेचा निकाल – 31 डिसेंबर 2020
  • मुख्य परीक्षा – 24 जानेवारी 2021

अर्ज शुल्क –

जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस वर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 850 रुपये आहे. तर एससी/एसटी, दिव्यांग उमेदवारांसाठी 175 रुपये आहे.

शिक्षण व वयाची अट –

इच्छुक उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवीधर असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवाराचे वय किमान 20 आणि कमाल 28 वर्ष असणे गरजेचे आहे. आरक्षित वर्गांना वयात सूट मिळेल.

निवड प्रक्रिया –

उमेदवारांची निवड पुर्व व मुख्य परीक्षेतील गुणांच्या आधारावर केली जाईल. दोन्ही परीक्षा ऑनलाईन होतील. अधिक माहितीसाठी व नॉटिफिकेशनसाठी येथे क्लिक करा. अर्ज करण्यासाठी  https://ibpsonline.ibps.in/  या लिंकला भेट द्यावी.