कोरोनाच्या लढाईतील माझ्या कामाचे मोदींनी कौतुक केले, ट्रम्प यांचा दावा


अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आहे. भारतीय समुदायाच्या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात आताच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरस टेस्टिंगबाबत केलेल्या शानदार कामगिरीचे कौतुक केले आहे.

जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण अमेरिकेत आहे. तर त्यापाठोपाठ भारत दुसऱ्या स्थानावर आहे. कोरोना चाचणी देखील भारत अमेरिकेपेक्षा मागे आहे. निवडणूक रॅलीमध्ये ट्रम्प म्हणाले की, आतापर्यंत आपण भारताच्या तुलनेत जास्त कोरोना टेस्ट केल्या आहेत. टेस्टिंगच्या बाबतीत अमेरिकेनंतर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. आपण भारतापेक्षा 4.4 कोटी टेस्ट अधिक केल्या आहेत.

ट्रम्प यांनी दावा केला की, पंतप्रधान मोदींनी मला फोन करत टेस्टिंगबाबत केलेल्या कामाचे कौतुक केले.

दरम्यान, अमेरिकेत कोरोना ग्रस्तांचा आकडा 65 लाखांच्या पुढे गेला आहे. तर भारताने 47 लाखांचा आकडा ओलांडला आहे. भारतात दररोज 90 हजारांपेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत.