दावा; मोदींपासून ते उद्धव ठाकरेंपर्यंत 10 हजार भारतीयांची हेरगिरी करत आहे चीन


भारत-चीनमध्ये एलएसीवर तणावाची स्थिती असून, युद्ध सदृश्यस्थिती निर्माण झाली आहे. चीन एका बाजूला शांततेची भूमिका दर्शवत आहे तर, दुसऱ्या बाजूला सीमेवर आक्रमक वृत्ती दाखवत आहे. यातच आता कुरापतखोर चीन भारतात हेरगिरी करत असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. चीन काही कंपन्यांद्वारे पंतप्रधानांपासून ते केंद्रीय मंत्री आणि मुख्यंत्र्यांपासून ते लष्करी अधिकाऱ्यांची हेरगिरी करत आहे. भारत चीनी टेक कंपन्यांवर बंदी घालत असताना, अशा प्रकारचा खुलासा धक्कादायक आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.

इंडियन एक्सप्रेसने दावा केला आहे की, चीनची कंपनी झेनुआ भारतात जवळपास 10 हजार लोकांवर लक्ष ठेवून आहे. या कंपनीचा चीन सरकार आणि कम्यूनिस्ट पक्षांचा थेट संबंध आहे. ही कंपनी जवळपास 10 हजार भारतीयांची देखरेख करत आहे. यात पंतप्रधानांपासून ते महापौरांपर्यंत महत्त्वाच्या व्यक्ती समावेश आहे.

झेनुआ डेटा इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी कंपनी लिमिटेडकडून ज्या भारतीयांची देखरेख केली जात आहे, त्यामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश बोबडे, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, गांधी कुटुंब, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, नवीन पटनायक सारख्या देसातील महत्त्वाच्या व्यक्तीचा समावेश आहे. याशिवाय राजनाथ सिंह, पीयूष गोयल सारख्या केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, चीनी कंपन्या या सर्व प्रमुख्य व्यक्तींच्या डिजिटल आयुष्याला फॉलो करत आहे. सोबतच या लोकांचे नातेवाईक आणि समर्थक कसे काम करतात यावर देखील लक्ष ठेवत आहेत. चीनी कंपन्या या सर्व लोकांचे रियल टाइम डेटा कलेक्ट करून चीनी सरकारसोबत शेअर करत आहे.

इंडियन एक्सप्रेसने दावा केला आहे की, या पुर्ण तपासात शेनजान इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी फर्मने चीन सरकार आणि कम्यूनिस्ट पक्षासोबत मिळून ओव्हरसीज इंफॉर्मेशन डेटा बेस तयार केला आहे. ज्याअंतर्गत पुर्ण मिशनचे काम केले जात आहे.  कंपनीकडून जमा करण्यात आलेल्या डेटाला हायब्रिड वॉर नाव देण्यात आले आहे. नेत्यांव्यतिरिक्त सचिन तेंडूलकर सारखे खेळाडू, गौतम अदानी सारखे उद्योगपती, गुन्हेगार आणि कलाकारांचा देखील समावेश आहे.