आता बिग बींच्या आवाजात तुमच्याशी संवाद साधणार ‘अ‍ॅलेक्सा’


बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या भारदस्त आवाजाचे तर अनेकजण चाहते आहेत. त्यांच्या आवाजातील जुने डॉयलॉग आजही लोक ऐकत असतात. आता अमिताभ बच्चन हे थेट तुमच्याशी थेट संवाद साधणार आहेत. बिग बी यांनी अ‍ॅमेझॉनसोबत भागीदारी केली आहे. याअंतर्गत आता भारतात पहिल्यांदाच अ‍ॅलेक्सामध्ये सेलिब्रेटी आवाज उपलब्ध होईल.

अ‍ॅमेझॉन इंडियानुसार आता ग्राहकांना भारतात अ‍ॅलेक्सामध्ये अमिताभ बच्चन यांचा आवाज मिळेल. यासाठी अमिताभ बच्चन वॉयस एक्सपिरिएंस खरेदी करावे लागेल. हे फीचर पुढील वर्षीपासून ग्राहकांसाठी उपलब्ध होईल. बिग बींच्या आवाजात अ‍ॅलेक्सामध्ये लोकप्रिय वॉयस कमांड्स मिळेल. जसे की जोक्स, हवामान, शायरी, प्रेरणादायी विचार या गोष्टी अमिताभ बच्चन यांच्या आवाजात उपलब्ध असतील.

या भागीदारीबाबत अमिताभ बच्चन म्हणाले की, याबाबत उत्साहित आहे. वॉयस टेक्नोलॉजीद्वारे आपण प्रेक्षक आणि वेल विशर्सशी एंगेज राहता येईल.

अ‍ॅलेक्साला भारतात सेलिब्रेटी वॉइस देणारे अमिताभ बच्चन हे पहिलेच कलाकार आहेत. दरम्यान, बच्चन यांचा वॉयस एक्सपिरियंस खरेदी करण्यासाठी युजर्सला किती पैसे द्यावे लागतील हे कंपनी अद्याप स्पष्ट केलेले नाही.