आयफोन १२ सिरीज स्पेसिफिकेशन्स लिक
गेले काही दिवस आयफोन १२ सिरीज स्पेसिफिकेशन लिक करणारे लाईव्ह व्हिडीओ प्रसारित केले जात असून त्यात आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. एव्हरीथिंग अॅपल प्रो टीपस्टर या संदर्भात एक छोटीशी क्लिप सादर केली असून त्यानुसार आयफोन १२ सिरीज एलआयडीएआर सेन्सर सह, फ्लॅट साईड स्मार्ट कनेक्टर आणि विभिन्न कटआउट, वायरलेस चार्जिंग कॉइलसाठी जागेसह असल्याचे दिसत आहे. या क्लिप मध्ये आयफोन १२ प्रोचे बॅक पॅनल दिसत आहे. या फोनचे डिझाईन आयफोन ४ व ५ प्रमाणे बॉक्सी शेपचे आहे. आयफोन ११ प्रमाणे यात ट्रिपल कॅमेरा सेट दिसत आहे.
टीपस्टर जॉन प्रॉसरच्या म्हणण्यानुसार आयफोन १२ चे उत्पादन या आठवड्यात सुरु झाले आहे. ही सिरीज १२० एचझेड रिफ्रेश रेट डिस्प्ले सह येणार नाही तर ती ६० किंवा ९० एचझेडसह असेल. सर्व मॉडेलना वायरलेस चार्जिंग सुविधा मिळेल. आयटी होमच्या रिपोर्ट नुसार मजबूत मॅग्नेट सह येणारी आयफोनची ही पहिली पिढी आहे. हे मॅग्नेट, फोन चार्जिंग पॅडवर ठेवल्यावर तो चार्जिंग साठी ऑप्टिमल पोझिशनमध्ये नेते.
१५ सप्टेंबरला अॅपल टाईम फ्लायिंग कार्यक्रम करत असून त्यात एक बजेट वॉच, अॅपल पाच सिरीजची सहा वॉच व दोन आयपॅड मॉडेल सादर करणार आहे.