Vi ला मिळाले आयपीएलच्या लाईव्ह ब्रॉडकास्टचे को-स्पॉन्सरशिप हक्क


टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडियाने काही दिवसांपुर्वीच आपले रिब्रँड करत नवीन नाव आणि लोगो जारी केला होता. आता कंपनी व्ही (Vi) ब्रँड नेम अंतर्गत ऑपरेट होते. यातच आता कंपनीला आयपीएल 2020 चे को-स्पॉन्सरशिप मिळाली आहे. याआधी ड्रीम-11 कंपनीला आयपीएलची प्रमुख स्पॉन्सरशिप मिळाली होती.

व्होडाफोन-आयडियाचे आधीही थोड्याफार प्रमाणात आयपीएलमध्ये सहभागी होते. मात्र दोन्ही कंपन्यांचे 2018 विलिनिकरण झाल्यानंतर पहिल्यांदाच व्ही ब्रँड अंतर्गत आयपीएलला को-स्पॉन्सर करणार आहे.

19 सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होणाऱ्या आयपीएलच्या लाईव्ह ब्रॉडकास्टचे को-स्पॉन्सरशिप हक्क मिळाले आहेत. दरम्यान याआधी ड्री-11ने 222 कोटी रुपयांमध्ये आयपीएल 2020 ची स्पॉन्सरशिप मिळवली होती. Vi आणि स्टार स्पोर्ट्समध्ये झालेल्या करारामधील आर्थिक आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही.