केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पुन्हा एकदा प्रकृती बिघडल्याने एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना श्वास घेण्यास समस्या येत असल्याने काल रात्री 11 वाजता एम्समध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. याआधी अमित शाहांना 18 ऑगस्टला एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.
अमित शाहांची प्रकृती बिघडली, पुन्हा एम्समध्ये दाखल
2 ऑगस्टला अमित शाहांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करत दिली होती. यानंतर 14 ऑगस्टला त्यांची कोरोना चाचणी नेगेटिव्ह आली होती. त्यांच्यावर मेंदाता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. रिपोर्ट नेगेटिव्ह आल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमधून सोडण्यात आले होते. मात्र पुन्हा काळजी घेण्यासाठी 18 ऑगस्टला देखील एम्समध्ये भरती झाले होते.
काल हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याच्या एक दिवसआधीच त्यांनी अहमदाबाद जिल्हा आणि शहरात 222.17 कोटींच्या विविध विकास कार्यांचे लोकार्पण केले. त्याआधी देखील ते मोठ्या प्रमाणात सक्रिय होते.