मोठा दिलासा, सीरम इंस्टिट्यूट लवकरच पुन्हा सुरू करणार ऑक्सफोर्डच्या लसीचे ट्रायल


जगभरात कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. वैज्ञानिक यावरील लस शोधण्याचा दिवसरात्र प्रयत्न करत आहे. संपुर्ण जग वाट पाहत असलेल्या ऑक्सफोर्डच्या कोरोना प्रतिबंधक लसीचे ट्रायल काही दिवसांपुर्वी रोखण्यात आले होते. ब्रिटनमधील एक स्वयंसेवक आजारी पडल्याने हे ट्रायल स्थगित केले होते. मात्र आता ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीने माहिती देत सांगितले की, लवकर लसीचे ट्रायल पुन्हा सुरू केले जाणार आहे.

ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीने निवेदन जारी करत माहिती दिली की, ऑक्सफोर्ड कोरोना लसीचे ट्रायल ब्रिटनच्या सर्व परीक्षण केंद्रांवर पुन्हा सुरू केले जाणार आहे. जागतिक स्तरावरील जवळपास 18000 लोकांना डोस देण्यात आले आहेत. या प्रकारच्या मोठ्या ट्रायलमध्ये काही स्वयंसेवकांना त्रास होणार, याची आम्हाला आधीच आशा होती. यासाठी त्यांच्या सुरक्षेचे सावधरित्या मुल्यांकन केले पाहिजे.

यानंतर पुण्यातील सीरम इंस्टिट्यूटने देखील डीजीसीआयने परवानगी दिल्यावर लगेच ट्रायल पुन्हा सुरू केले जाईल असे सांगितले. इंस्टिट्यूटचे सीईओ अदार पुनावाला यांनी ट्विट केले की, जसे मी आधी सांगितले होते त्याप्रमाणेच, आपण ट्रायल पुर्ण होण्याआधी कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहचायला नको. घडलेल्या घटना या उदाहण आहेत की आपण प्रक्रियेबाबत कोणतीही धारणा ठरवू नये आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत याचा आदर केला पाहिजे. ही एक चांगली बातमी आहे.