कोरोना : रशिया सर्वात प्रथम ‘या’ देशाला देणार लसीचे 5 कोटी डोस


रशियाने मागील महिन्यात आपल्या स्पुटनिक-व्ही या कोरोना प्रतिबंधक लसीला मंजूरी दिली होती. या लसीचे तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल आणि लसीकरण सुरू झाले आहे. अनेक देश रशियीची ही लस खरेदी करण्यासाठी इच्छुक आहे. रशिया सर्वात प्रथम लसीचे 5 कोटी डोसचा पुरवठा ब्राझीलला करणार आहे.

रशियन डायरेक्ट इंवेस्टमेंड फंडने सांगितले की, नोव्हेंबरपासून स्पुटनिक-व्ही लसीची डिलिव्हरी सुरू होईल. अद्याप ब्राझीलच्या रेग्यूलेटर्सकडून यास शेवटची मंजूरी मिळणे बाकी आहे. ब्राझील कोरोना व्हायरसचे रुग्ण असणारा तिसरा सर्वाधिक प्रभावित देश आहे. अमेरिका आणि भारतानंतर येथे सर्वाधिक 43 लाख कोरोना रुग्ण आहेत.

रशियाच्या कोरोना लसीसाठी ब्राझीलच्या राज्याने करार केला आहे. राष्ट्रीय स्तरावर देखील ब्राझील रशियाशी करार करण्याची शक्यता आहे. अनेक देशांनी रशियाच्या या लसीवर टीका केली होती. तरीही रशियाने आपली ही लस पुर्णपणे सुरक्षित असल्याचे म्हटले होते.

रशियाने सांगितले की लस तयार करण्यासाठी पायाभूत सुविधा आधीच तयार आहेत, त्यामुळे अल्पावधीतच लस तयार करण्यास शक्य झाले. लस तयार करणाऱ्या रशियाच्या संस्थेने दावा केला होता की विविध देशांनी अब्जावधी डोसची ऑर्डर दिली आहे.