दावा; मास्क कोरोनाचा संसर्ग रोखण्यास व रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास परिणामकारक


कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालय सुरुवातीपासूनच गाईडलाईन्स जारी करत आहे. यात मास्क घालणे आणि सोशल डिस्टेंसिंगचे पालन करण्याला प्राधान्य देण्यात आलेले आहे. यात आता एका रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की मास्कचा वापर केल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यास व शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत होते.

‘न्यू इंग्लैंड जर्नल ऑफ मेडिसीन’ मध्ये यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचे मोनिका गांधी आणि जॉर्ज डब्ल्यू रुथेरफोर्ड म्हणाले की, फेस मास्कचा वापर केल्याने संसर्ग कमी करणे शक्य आहे. सोबतच याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत मिळू शकते. तज्ञांनुसार, व्हायरल रोगजनकांच्या दीर्घकालीन सिद्धांतासह ही शक्यता योग्य आहे. ज्याच्या मते आजाराची गंभीरता व्हायरल इनोकुलम ( लागण झालेल्या व्हायरसचे प्रमाण) वर अवलंबून असते.

गांधी आणि रदरफोर्ड यांनी शक्यता वर्तवली की, जर व्हायरल कोरोनाचे संक्रमण आजाराची गंभीरता ठरवत असल्यास चेहऱ्यावरील मास्क संसर्गाचे प्रमाण कमी करू शकते. जर्नलमध्ये लिहिले आहे की, मास्क काही व्हायरस युक्त थेंबांना फिल्टर करत असते. ज्यामुळे मास्क घातल्याने इनोकुलम कमी होते.

विशेषज्ञांना जर्नलमध्ये लिहिले की, लसींकडून केवळ संसर्ग रोखण्याची आशा नसते. बहुतेक लसींच्या चाचण्यांमध्ये आजाराची तीव्रता कमी करण्याच्या दुय्यम परिणांमाचा समावेश असतो. मास्क घालण्याची सवय नवीन संसर्गाचा दर कमी करू शकते. आम्ही असा गृहित धरतो की नवीन लक्षण असलेल्या संसर्गाचे प्रमाण कमी केल्याने, संसर्गजन्य रुग्णांचे प्रमाण कमी होते.