मास्क न वापरण्यातही पुणेकर पुढे, 1 आठवड्यात वसूल केला कोट्यावधी रुपयांचा दंड


देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. असे असले तरी काही लोक या महामारीला गांभीर्याने घेताना दिसत नाही. देशात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या पुण्यात आहे. असे असले तरी पुणेकर मात्र नियमांचे काटेकोर पालन करताना दिसत नाही. अशा बेशिस्त पुणेकरांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. 2 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर या एका आठवड्यात विना मास्क बाहेर फिरणाऱ्या 27,989 पुणेकरांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून तब्बल 13,994,500 रुपये दंड जमा केला आहे.

पुणे पोलीस डीसीपी बच्चन सिंह यांनी याबाबत आकडेवारी जारी केली. मास्क न लावता बाहेर फिरणाऱ्या  27,989 लोकांवर कारवाई करण्यात आली व प्रत्येकाकडून 500 रुपये दंड घेण्यात आला. जिल्हाधिकारी राजेश देशमुख म्हणाले की, ग्रामीण भागा पकडून आतापर्यंत जवळपास 1.5 कोटी रुपये दंड जमा करण्यात आला आहे.

दरम्यान, पुणे हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालला असून, दररोज 4 हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण जिल्ह्यात आढळत आहेत.