‘आशा आहे मला न्याय मिळेल’, कंगनाने घेतली राज्यपालांची भेट


अभिनेत्री कंगना राणावत मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी चर्चा केल्यानंतर वादात अडकली होती. मुंबई महापालिकेने तिच्या ऑफिसवर कारवाई केली होती. या घटनेनंतर आज कंगनाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत आपले मत मांडले.

कंगना म्हणाली की, मी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. माझ्यासोबत जो अन्याय झाला, त्याबाबत चर्चा केली. ज्या प्रमाणे मला वागणूक मिळाली, त्याबाबत मत मांडले. मला आशा आहे की मला न्याय मिळेल. जेणेकरून, युवा तरुणींसह सर्व नागरिकांचा सिस्टमवर विश्वास कायम राहील. माझे माझे भाग्य आहे की राज्यपालांनी  मुलीचे ऐकून घेतले.

राज्यपालांच्या भेटीवेळी कंगनासोबत तिची बहिण रंगोली चंदेल देखील होती. याआधी कंगनाने करणी सेनेच्या कार्यकर्त्यांची देखील आपल्या घरी भेट घेतली होती.

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या पाली हिल स्थित अनाधिकृत ऑफिसवर कारवाई केली होती. यानंतर कंगनाने न्यायालयात धाव घेत यावर स्थगिती मिळवली होती.