अधिवेशनाच्या आधी सोनिया गांधी उपचारासाठी अमेरिकेला रवाना


काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपचारासाठी काल अमेरिकेला रवाना झाल्या आहेत. त्यांच्यासोबत राहुल गांधी देखील अमेरिकेला गेले आहेत. पक्षाचे महासचिव आणि मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी याबाबतची माहिती ट्विट करत दिली. त्यांनी ट्विट केले की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी नियमित चेकअपसाठी परदेशात गेल्या आहेत. महामारीमुळे आधीच यासाठी उशीर झाला आहे. त्यांच्यासोबत राहुल गांधी देखील गेले आहे.

याआधी सोनिया गांधी 30 ऑगस्टला दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या होत्या. नियमित तपासणीसाठी त्यांना दाखल करण्यात आले होते. परदेशात जाण्याआधी सोनिया गांधींना शुक्रवारी संघटनेत मोठे बदल केले होते.

एनडीटिव्हीच्या वृत्तानुसार, सोनिया गांधी या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधीच परदेशात उपचारासाठी गेल्या आहे. यामुळे सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात त्या सहभागी होऊ शकणार नाही. त्या कमीत कमी 2 आठवडे तेथे राहण्याची शक्यता आहे. तर राहुल गांधी हे काही दिवसांनी परतणार असून, त्यांनी प्रियंका गांधी वाड्रा या सोनिया गांधींजवळ जातील.