लाखो डिव्हाईसला धोका, ब्लूटूथद्वारे हॅकर्सपर्यंत पोहचत आहे सर्व डेटा


ब्लूटूथ हे आपल्या डिव्हाईसमधील एक महत्त्वाचे फीचर आहे. हे फीचर डिव्हाईसला वायरलेस कनेक्ट करणे आणि डेटा ट्रांसफर करण्यास मदत करते. मात्र एका रिपोर्टनुसार ब्लूटूथ लाखो डिव्हाईससाठी मोठा धोका ठरत आहे. ब्लूटूथमध्ये एक त्रुटी आढळली असून, याद्वारे हॅकर्स फोन हॅक करत असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

न्यूज18 च्या वृत्तानुसार, या त्रुटीमुळे हॅकर्स दोन ब्लूटूथ डिव्हाईसेमधील सिक्यूरिटी कीजला अ‍ॅकेस्स करतात. यानंतर ते ब्ल्टूथ डिव्हाईसला आपल्या आजुबाजूला कनेक्ट करतात. दोन डिव्हाईसेजच्यामध्ये ऑथेंटिकेशन-की सेटअप करणाऱ्या कंपोनेंट यासाठी जबाबदार आहे. Cross-Transport Key Derivation (CTKD) याबाबत माहिती दिली आहे.

डिव्हाईस ऑथेंटिकेशन-की द्वारे डिव्हाईसज कोणत्याही स्टँडर्डला कनेक्ट करायचे ते ठरवतात. हॅकर्स ऑथेंटिकेशन-की बदलून दोन डिव्हाईसमधील इनक्रिप्शन देखील कमकुवत करू शकतात. यानंतर मॅलेशियस डेटा ब्लूटूथद्वारे डिव्हाईसमध्ये पाठवला जातो. रिपोर्टनुसार, ज्या डिव्हाईसमध्ये ब्लूटूथ 4.0 आणि ब्लूटूथ 5.0 सपोर्ट करते त्यांना धोका आहे. ब्लूटूथ 5.1 स्टँडर्डमध्ये बिल्ट-इन सेफ्टी मकेनिज्म देण्यात आलेले आहे, जे या त्रुटीला दूर करते.

मॅन्युफॅक्चरर्सकडून अद्याप या त्रुटीबाबत युजर्सला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सोबतच त्रुटी दुरुस्ती करण्यासाठी अद्याप सिक्यूरिटी पॅच देखील रोल आउट केलेले नाही. अनेक युजर्सनी वनप्लस नॉर्डमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसाठी समस्या येत असल्याचे म्हटले होते. समस्या दूर करण्यासाठी वनप्लसने अपडेट देखील जारी केले आहे.