… आणि चक्क मुलाचे X Æ A-12 नावच विसरले इलॉन मस्क, व्हिडीओ व्हायरल


टेस्ला आणि स्पेस एक्सचे मालक इलॉन मस्क हे काही महिन्यांपुर्वी आपल्या मुलाचे जगापेक्षा असे वेगळे नाव ठेवल्याने चर्चेत आले होते. आता आश्चर्य म्हणजे ते स्वतःच आपल्या मुलाचे नाव विसरले. ही तशी काही हैराण करणारी गोष्ट नाही कारण, त्यांच्या मुलाचे नावच X Æ A-12 असे आहे. मस्क यांची जोडीदार ग्रिम्सने मे महिन्यात बाळाला जन्म दिला होता. मस्क आपल्याच मुलाचे नाव काही वेळासाठी विसरल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मस्क बर्लिनमध्ये गीगा फॅक्ट्रीच्या दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना X Æ A-12 कसा आहे ?, असा प्रश्न विचारला. प्रश्न ऐकून मस्क देखील शांत झाले, काही सेंकदासाठी त्यांना काही सुचलेच नाही. त्यांनी पत्रकाराला प्रश्न पुन्हा विचारण्यास सांगितला. यावर हसत उत्तर देताना ते म्हणाले की, ओह, तुमचा अर्थ माझा मुलगा ? एखाद्या पासवर्ड सारखे वाटत आहे.

दरम्यान, मुलाचे X Æ A-12 असे नाव ठेवले असले तरीही जन्मदाखल्यावर हे नाव दिसणार नाही. कारण कॅलिफोर्नियाच्या कायद्यानुसार इंग्रजीतील 26 अक्षरच नावात असू शकतात. नाव समोर आल्यानंतर अनेकांनी याचा अर्थ देखील शोधण्याचा प्रयत्न केला. स्वतः ग्रिम्सने ट्विट करत यामागचा अर्थ उलगडला. मात्र तो अर्थही अनेकांना डोक्यावरुन गेला.