सोनू सूद गरजू विद्यार्थ्यांना देणार मोफत शिक्षण, आईच्या नावाने सुरू केली स्कॉलरशिप


अभिनेता सोनू सूद मागील 4-5 महिन्यांपासून आपल्या लोकहितासाठी केलेल्या कार्यामुळे विशेष चर्चेत आहे. लॉकडाऊनपासून सोनू सूद प्रत्येकाच्या मदतीसाठी पुढे येत आहे. लॉकडाऊनमध्ये त्याने हजारो प्रवासी कामगारांना आपल्या घरी जाण्यासाठी मदत केली. त्यांच्यासाठी बस, रेल्वेची सोय केली. एवढेच नाही तर परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांना देखील मायदेशी आणले.

यानंतर त्यांना कामगारांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी देखील प्रयत्न केले. आता सोनू सूद गरजू विद्यार्थ्यांसाठी पुढे आला आहे. अनेकदा प्रतिभावान विद्यार्थी गरीबीमुळे मागे राहतात, अशा विद्यार्थ्यांसाठी सोनू सूदने स्कॉलरशिप सुरू केली आहे. या स्कॉलरशिपला सोनू सूदने आपल्या दिवंगत आईचे नाव दिले आहे.

सोनू सूदने ट्विट करत माहिती दिली की, उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप लाँच करत आहे. आपल्या लक्ष्यापर्यंत पोहचण्यासाठी आर्थिक आव्हाने अडचणी ठरू नये, असा माझा विश्वास आहे. स्कॉलरशिपसाठी पुढील 10 दिवसात [email protected] मेल वर अर्ज करा.

विद्यार्थ्यांसाठी सोनू सूदने लाँच केलेल्या या स्कॉलरशिपचे नेटकरी देखील भरभरून प्रशंसा करत आहेत.