पियाजियो इंडियाने बंगळुरू येथील ओटीओ कॅपिटलशी करार केला आहे. यामुळे आता ग्राहकांना वेस्पा आणि अप्रिलिया रेंजच्या स्कूटर भाड्याने मिळणार आहे. भाड्यावर स्कूटर देण्याची ही सेवा पुणे आणि बंगळुरूमध्ये उपलब्ध केली जाईल. ग्राहक कोणतेही डाउनपेमेंट न करता ईएमआयवर स्कूटर घेऊन जाऊ शकतील. याशिवाय सदस्यता घेतल्यावर त्यात रजिस्ट्रेशन, विमा आणि मेंटेनस देखील मिळेल.
आता भाड्याने मिळणार वेस्पा आणि अप्रिलिया स्कूटर

पिआजिओ इंडियाचे अध्यक्ष आणि एमडी डिएगो ग्रॅफी म्हणाले की, आम्ही स्कूटर चालविण्यासाठी या नवीन मॉडेलसाठी ओटीओ कॅपिटलसोबत केलेल्या भागीदारीचे स्वागत करतो. आमचे ग्राहक वेस्पा आणि अप्रिलिया चालवण्यासाठी या नवीन पर्यायाचा आनंद घेऊ शकतात. आम्हाला विश्वास आहे की भारतातील तरुणांना वेस्पा आणि अप्रिलिया एक प्रिमियम अनुभव देईल.

ओटीओ कॅपिटलने माहिती दिली की, अप्रिलिया आणि वेस्पा स्कूटर भाड्याने घेण्यासाठी पहिल्या महिन्याच्या 2500 रुपये सदस्य शुल्कात सूट दिली जाईल. स्कूटर काही महिन्यांपासून ते 3 वर्षांपर्यंत भाड्याने घेता येईल. यानंतर ग्राहकांकडे राहिलेली रक्कम भरून स्कूटर खरेदी करण्याचा देखील पर्याय असेल. याशिवाय ते नवीन वाहनात अपग्रेड देखील करू शकतात.