पार्टीमध्ये अधिकाऱ्यांनी केली किम जोंगवर टीका, हुकुमशहाने दिली मृत्यूदंडाची शिक्षा

उत्तर कोरियाने आपल्या अर्थमंत्रालयाच्या 5 अधिकाऱ्यांना कथितरित्या मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे. दावा केला जात आहे की एका डिनर पार्टीमध्ये या अधिकाऱ्यांनी उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांच्या धोरणांवर टीका केली होती. ही घटना एक वर्षांपुर्वीची असल्याचे समजते, ज्याची माहिती आता समोर आली आहे.

अर्थमंत्रालयाचे 5 अधिकारी उघडपणे उत्तर कोरियाच्या डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेविषयी चर्चा करत होते. त्यामुळे त्यांना थेट गोळ्या घालण्यात आल्या. या अधिकाऱ्यांचा कुटुंबांना एका राजकीय कॅम्पमध्ये पाठवण्यात आले आहे. हे अधिकारी अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी इंडस्ट्रियल बदल आवश्यक असल्याचे व जागतिक मदत घेण्याविषयी बोलत होते.

उत्तर कोरियाच्या अर्थव्यस्था मोठ्या संकटात अडकली आहे. कोरोना व्हायरसमुळे तर देशातील स्थिती अधिकच गंभीर झाली आहे. डिनर पार्टीमध्ये किम जोंग उन यांच्या धोरणांवर टीका केल्याची माहिती सर्वात प्रथम वरिष्ठ अधिकाऱ्याला मिळाली. त्यानंतर बैठक बोलवून सिक्रेट पोलिसांकडून त्यांना अटक करण्यात आले व आपला गुन्हा कबूल करण्यास जबरदस्ती करण्यात आली.